नवीनम्हणी ऐका...
आधुनिक युगाच्या अफलातून आधुनिक म्हणी-
१) राहायला नाही घर म्हणे लग्न कर !🍥
२) सासु क्लबमध्ये सुन पबमध्ये !🍥
३) खिशात नाही डोनेशन, घ्यायला चालला ऍडमिशन !🍥
४) मुलं करतात चॅनेल सर्फ़, आईबाप करतात होमवर्क !🍥
५) चुकली मुलं सायबरकॅफ़ेत !🍥
६) चुकल्या मुली ब्युटीपार्लरमध्ये !🍥
७ ) ज्या गावचे बार, त्याच गावचे हवालदार !🍥
८) नाजुक मानेला मोबाईलचा आधार !🍥
९) मनोरंजन नको रिंगटोन आवर !🍥
१०) स्क्रिनपेक्षा एस एम एस मोठा !🍥
११) जागा लहान फ़र्निचर महान !🍥
१२) उचलला मोबाईल लावला कानाला !🍥१३) रिकाम्या पेपरला जाहिरातिंचा आधार !🍥
१४) काटकसर करुन जमवलं, इंकम टॅक्समध्ये गमावलं 🍥
१५) साधुसंत येती घरा, दारंखिडक्या बंद करा !🍥
१६) ज्याची खावी पोळी, त्यालाच घालावी गोळी🍥
१७) एकमेका पुरवू कॉपी, अवघे होऊ उत्तीर्ण !🍥
१८) लांबून देखणी, जवळ आल्यावर चकणी !🍥
१९) चोर्या करुन थकला आणि शेवटी आमदार झाला🍥
२०) आपले पक्षांतर, दुसर्याचा फुटीरपणा !🍥२१) प्रयत्ने लाईनीत उभे राहता रॉकेलही मिळे !🍥
२२) अन्यायाचा फास बरा, पण चौकशीचा त्रास आवरा !🍥
२३) जया अंगी खोटेपण, तया मिळे मोठेपण !🍥
२४) एल.एल.बी झालो अन भिकेला लागलो !🍥
२५) सरकार जेवू घालीना, पदवी भिक मागू देईना 🍥
२६) वशिल्याच्या नोकरीला इंटरव्ह्यु कशाला !🍥
२७) वयही गेले, पैसेही गेले, हाती राहीले दाखले !🍥
२८) घोड्याच्या शर्यतीत वशिल्याचे गाढव पुढे !🍥
२९) साहेबापुढे वाचली गीता, कालचा मेमो बराहोता !🍥
३०) गाढवापुढे वाचली गीता वाचणारा गाढव होता !🍥
३१) स्मगलींगचे खाणार, त्याला दाऊद देणार !🍥
३२) मी हसते लोका, शेंबूड माझ्या नाका !🍥
३३) न्हाव्यावर रुसला अन जंगल वाढवून बसला!🍥
३४) पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा !🍥
३५) पुढार्याचं मुळ व हॉटेलची चूल पाहु नये !🍥
३६) नाव सुलोचनाबाई, चष्म्याशिवाय दिसत नाही !🍥
३७) नाव गंगूबाई, आंघोळीला पाणी नाही!🍥
३८) घरात नाही दाणा आणी म्हणे बर्शन आणा !🍥
३९) घरावर नाही कौल पण अॅंटीनाचा डौल !🍥
४०) घाईत घाई त्यात चष्मा नाही !🍥
४१) रिकामा माळी ढेकळ फोडी !🍥
४२) घरोघरी मॉडर्न पोरी !🍥
४३) ओठापेक्षा लिपस्टीक जड !🍥
४४) नाकापेक्षा चष्मा जड !🍥
४५) अपुर्या कपडयाला फॅशनचा आधार !🍥
४६) बायकोची धाव माहेरापर्यंत !🍥
४७) गोष्ट एक चित्रपट अनेक !🍥
४८) काम कमी फाईली फार!🍥
४९) लाच घे पण जाच आवर !🍥
५०) मंत्र्याच पोर गावाला घोर !🍥
५१) मरावे परी मूर्तिरुपे उरावे !🍥
५२) नटीच्या लग्नाला सतरा नवरे !🍥
५३) मिळवत्या मुलीला मागणी फार !🍥
५४) रिकामी मुलगी शृंगार करी!🍥
५५) प्रेमात पडला हुंडयास मुकला !🍥
५६) दुरुन पाहुणे साजरे !🍥
५७) ऑफीसात प्यून शहाणा !🍥
५८) सत्ता नको पण खैरनार आवर !🍥
५९) एक ना धड भाराभर पक्ष !🍥
६०) हरावे परी डिपॉझिटरुपी उरावे !🍥
६१) थेंबे थेंबे लोकसंख्या वाढे !🍥
६२) तोंडाला पदर गावाला गजर !🍥
६३) कष्टानं कमावलं बाटलीनं गमावलं !🍥६४) रात्र थोडी डास फार !🍥
६५) शिर सलामत तो रोज हजामत !🍥
६६) नेता छोठा कटआऊट मोठा !🍥
६७) चिल्लरपुरता सत्यनारायण!🍥
६८) दैव देते आयकर नेत !🍥
६९) डीग्री लहान वशिला महान!
करा शेअर..👍👍👍
No comments:
Post a Comment