कविता आयुष्य जगन्यास वेळ नाही

तू गुंतला असा की,
जगण्यास वेळ नाही.....

अन् सांगतो जगाला,
मरण्यास वेळ नाही.....!

गाणार गीत केव्हा,
तू सांग जीवनाचे.....

जेव्हा तुलाच वेडया, हसण्यास वेळ नाही.....!

आयुष्य तू तुझे तर,
जगतो खुशाल आहे.....

आता जगाकडे ही,
बघण्यास वेळ नाही.....!

मिटणार ना कधी जे,
ते नाव दे यशाला.......

म्हण एकदा तरी की, 
हरण्यास वेळ नाही......!

आयुष्य युद्ध आहे,
जिंकून एकदा घे......

सांगू नको पुन्हा की, लढण्यास वेळ नाही.......!!!

No comments:

Post a Comment