*दृष्टीकोन*
एक तरुण आई डायनिंग टेबलापाशी बसून चिंतीत झाली होती . कारण नेहमीचेच . मार्च एंड असल्यामुळे इनकम टॅक्स भरणे भाग होते .
घरातील सर्व कामे तर करायचीच होती वर उद्या होळीच्या निमीत्ताने बरेच पाहुणे जेवायला येणार होते . या सगळ्या गोष्टींमुळे ती त्रस्त झाली होती .
जवळच तिची १० वर्षांची मुलगी आपली वहीत काहीतरी लिहीत होती. तिने मुलीला विचारले , "काय करतेयस ?" मुलगी म्हणाली, "आज teacher नी होमवर्क दिला आहे. विषय आहे 'negative thanks giving ' .आणि सांगितले आहे की अशा गोष्टींवर निबंध लिहा ज्या आपल्याला सुरूवातीला आवडत नाहीत पण नंतर आवडायला लागतात "
आईनं आश्चर्य व्यक्त करून वही बघायला घेतली . बघुया आपल्या मुलीने काय लिहीलय
मुलीने लिहीलं होतं
*- मी माझ्या वार्षिक परिक्षेला धन्यवाद देते कारण त्या नंतर उन्हाळी सुट्टी चालू होते ..*
*-मी त्या सर्व कडू आणि खराब स्वादाच्या औषधांना धन्यवाद देते कारण त्या घैतल्यावरच माझी तब्येत चांगली होते.*
*- मी गजराच्या घड्याळाला धन्यवाद देते कारण पहाटे पहाटे तेच मला मी अजूनही जिवंत असल्याचे सांगत असते .*
वाचता वाचता आईच्या मनात विचार आला की अरे माझ्याकडे पण अशा अनेक गोष्टी आहेतच की ज्यांच्या साठी मी धन्यवाद व्यक्त करू शकते .
विचार करता करता खूप बाबी समोर आल्या
*" income tax द्यावा लागतो याचाच अर्थ सुदैवाने माझ्याकडे चांगल्या पगाराची नोकरी आहे ."*
*" घरी भरपूर काम कराव लागत म्हणजेच माझ्याकडे एक घर , एक हक्काचे आश्रयस्थान आहे .."*
*" सणासूदीला मला खूप माणसांसाठी जेवण बनवावे लागते म्हणजेच माझ्या कडे भरपूर नातेवाईक आहेत जे माझ्या सुख दुःखाचे साथीदार आहेत ."*
*गोष्टीचे तात्पर्य -*
प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन महत्त्वाचा ..
*चला आपणही असाच positive attitude ठेऊन आपल्या आयुष्यातील प्रत्येक दिवस सोनेरी बनवूया.*
No comments:
Post a Comment